

Andaman Nicobar Prison Gets New Rules
Esakal
ब्रिटीश राजवटीत अंदमान निकोबारमधील तुरुंगवासाला काळ्या पाण्याची शिक्षा मानलं जात असे. याच अंदमान-निकोबारमधील तुरुंग व्यवस्थेत केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. ब्रिटिश काळापासून लागू असलेल्या जुन्या तुरुंग कायद्यांच्या जागी नवे कायदे लागू केले आहेत. या नव्या नियमानुसार तुरुंगात कैद्यांमध्ये जातीनुसार भेदभाव करता येणार नाही. तसेच जातीच्या आधारावर कैद्यांना वेगवेगळं ठेवणं किंवा त्यांना कामं वाटून देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. चांगलं वर्तन असलेल्या कैद्यांसाठी खुल्या आणि अर्धखुल्या तुरुंगांची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे.