esakal | Global: ठसका लागला तरी सर्दी-खोकला झाल्याचा खुलासा करण्याची वेळ आली : व्लादिमीर पुतीन
sakal

बोलून बातमी शोधा

Vladimir Putin

ठसका लागला तरी सर्दी-खोकला झाल्याचा खुलासा करण्याची वेळ आली : व्लादिमीर पुतीन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मॉस्को : कोरोनाच्या जागतिक साथीमुळे नुसता ठसका लागला तरी कोविड-१९ नव्हे तर सर्दी-खोकला-पडसे झाल्याचा खुलासा करण्याची वेळ जगातील अनेकांवर आली आहे. यात आता रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांची भर पडली.

पुतीन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुरक्षा परिषदेची बैठक घेतली. सरकारी दूरचित्रवाणीवरूनही बैठकीचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यावेळी पुतीन वारंवार खोकत होते. खोकल्याचे प्रमाण वाढताच पुतीन स्वतःहून म्हणाले की, कोविड नाही, काळजी करू नका, सारे काही उत्तम आहे.

हेही वाचा: बाधितांंना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले

पुतीन यांच्या बैठकीनंतर त्यांच्या आणखी एका कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. त्याविषयी आधी घोषणा करण्यात आली नव्हती. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापती व्हॅलेंटीना मॅटव्हीयेन्को यांनी बैठकीनंतर पुतीन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्या म्हणाल्या की, प्रत्येक जण काळजीत पडला होता.

गेल्याच आठवड्यात पुतीन यांचा ६९वा वाढदिवस झाला. त्याआधी मागील महिन्यात त्यांना स्वयंविलगीकरण करावे लागले होते. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला होता. पुतीन यांनी सांगितले की, अधिकारी प्रत्यक्षात दररोज आमच्या चाचण्या करतात. त्या केवळ कोविड-१९साठीच नव्हे तर इतर सर्व प्रकारच्या संसर्गासाठी असतात. यासंदर्भात प्रत्येक गोष्ट ठिक आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत बंधाऱ्यात कार बुडाली,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

स्वयंविलगीकरणानंतर पुतीन यांना आजारपणाचे कोणतेही लक्षण जाणवले नव्हते. दोन आठवड्यांच्या कालावधीनंतर त्यांनी तुर्कस्तानचे अध्यक्ष रिजीब तय्यीप एर्दोगान यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्यानंतर मात्र त्यांनी बहुतांश सार्वजनिक कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतले आहेत. रशियात अलीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

बुस्टरसाठी आग्रह

पुतीन यांनी बुस्टरचा आग्रह धरला. मी थंड हवेत बाहेर पडलो होतो आणि अगदी सक्रियपणे फिरत होतो. यानंतरही कोणतीही भयंकर गोष्ट घडलेली नाही, असे सांगून ते म्हणाले की, तुम्हा सर्वांचे लसीकरण झाल्याची मला माहिती आहे. बुस्टरच्या रूपाने पुन्हा लस टोचून घ्यायचे विसरू नका.

loading image
go to top