Andhra Pradesh Shocker
esakal
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती गॅस सिलिंडर मिळत नसल्याने रागाच्या भरात एका महिलेनं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना गुत्ती मंडलातील तोंडपाडू गावातील असल्याचे सांगितले जात आहे. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.