
दोन राज्यातील ३०० महिलांना ओढलं प्रेमाच्या जाळ्यात, वाचा सविस्तर प्रकरण
कडापा: एका युवकाने दोन राज्यातील तब्बल ३०० महिलांसोबत प्रेमसंबंध (love) ठेवल्याचं प्रकरण समोर आलं आहे. महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून (cheat to women) त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा या युवकाचा उद्योग होता. सी प्रसन्ना कुमार (२३) असे आरोपीचे नाव असून तो प्रोद्दातुरचा रहिवाशी आहे. बी.टेक मध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रसन्नाने २०१७ मध्ये इंजिनिअरींगचे शिक्षण अर्ध्यावर सोडले.
ऐशोआरामी लाइफस्टाइल जगण्यासाठी महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रसन्ना त्यांची फसवणूक करायचा. आंध्र प्रदेश (andhra pradesh) आणि तेलंगण (telagana) या दोन राज्यातील तब्बल ३०० महिलांची त्याने फसवणूक केली. बहुतांश महिलांसोबत त्याचे शरीरसंबंधही होते. रविवारी आंध्र प्रदेश पोलिसांनी प्रसन्नाला अटक केली.
हेही वाचा: विराट सेनेच्या पाहुणचारासाठी 'हिरवे हिरवे गार गालिचे...'
आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांशी प्रथम मैत्री करायचा. त्यानंतर प्रेम आणि शरीरसंबंध प्रस्थापित करायचा. "प्रसन्नला २०१७ मध्ये आधी सोन साखळी चोरी आणि घरफोडीच्या प्रकरणात २०१७ मध्ये अटक झाली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची फसवणूक सुरु केली.
हेही वाचा: 'आमचा सी.एम जगात भारी', मनसेने मुख्यमंत्र्यांना केलं लक्ष्य
प्रणय आणि शरीरसंबंधाच्या क्षणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायची धमकी देऊन त्याने मोठ्या प्रमाणात पैसा उकळला" अशी माहिती कडापाचे पोलीस उपअधीक्षक बी. सुनील कुमार यांनी दिली. कडापा पोलिसांनी सुरुवातीला प्रसन्नाला घरफोडी आणि नोकरी घोटाळ प्रकरणात अटक केली होती. चौकशीमध्ये प्रसन्ना महिलांचे लैंगिक शोषण करुन त्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.
Web Title: Andhra Pradesh Btech Dropout Who Seduced 300 Women For Extort Money
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..