चंद्राबाबूंनी बेरोजगार ब्राह्मणांना वाटल्या कार

वृत्तसंस्था
शनिवार, 5 जानेवारी 2019

चंद्राबाबू नायडू म्हणाले, की आंध्र प्रदेश हे असे पहिले राज्य आहे ज्यामध्ये ब्राह्मण आयोग स्थापन करण्यात आला आहे. यामुळे गरीब ब्राह्मण कुटुंबाला शिक्षण, कौशल्य विकास, उद्योग आणि सांस्कृतिक कार्यकरीता आर्थिक सहाय्यता देण्यात येईल. 

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील ब्राह्मण समुदायाला प्रभावित करण्यासाठी बेरोजगार ब्राह्मण युवकांना कारचे वाटप केले आहे. त्यामुळे त्यांना रोजगार मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्राह्मण समुदायाला खूश करण्यासाठी चंद्रबाबू नायडूंनी ही युक्ती लढविली आहे. अमरावती येथे ब्राह्मण समुदायातील गरीब युवकांच्या मेळाव्यात त्यांनी 30 स्विफ्ट कारचे वाटप केले. अन्य समुदायाप्रमाणे या समाजातील आर्थिकदृष्टया कुमकुवत असलेल्या नागरिकांना सरकार मदत करणार असल्याचे चंद्राबाबूंनी म्हटले आहे.

आंध्र प्रदेशातील टीडीपी सरकारने ब्राह्मण सुमदायासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. सुमारे दहा हजार ब्राह्मणांना कर्ज आणि अनुदान देण्यात येणार आहे. सरकारने वाटलेल्या या 30 कारचा उपयोग वाहतुकीसाठी करता येणार आहे. 

चंद्राबाबू नायडू म्हणाले, की आंध्र प्रदेश हे असे पहिले राज्य आहे ज्यामध्ये ब्राह्मण आयोग स्थापन करण्यात आला आहे. यामुळे गरीब ब्राह्मण कुटुंबाला शिक्षण, कौशल्य विकास, उद्योग आणि सांस्कृतिक कार्यकरीता आर्थिक सहाय्यता देण्यात येईल. 

Web Title: Andhra Pradesh CM Chandrababu Naidu distributed cars to unemployed brahmin youths