Andhra Pradesh Bus Fire Tragedy
esakal
प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आंध्र प्रदेशच्या कुरनूरमध्ये शुक्रवारी पहाटे हा दुर्देवी प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार या बसमध्ये ४० प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर ८ जण गंभीर जखमी आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.