Andhra Lecturer Case : आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय महाविद्यालयीन प्राध्यापिकेनं लग्नानंतर (Marriage) अवघ्या सहा महिन्यांतच आत्महत्या केलीये. मृत्यूपूर्वी तिनं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पती आणि सासरच्या लोकांकडून झालेल्या अत्याचारांचा उल्लेख केला आहे.