Video : मास्क वापरा, असा सल्ला देणाऱ्या दिव्यांग महिलेला...

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जुलै 2020

फक्त मास्क लावायला सांगितला म्हणून...

- मास्क वापरणे सक्तीचे 

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मृतांचा आकडाही वाढत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जगातील सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध पर्यायांचा वापर करण्यात येत आहे. पण, आता मास्क वापरा असा, सल्ला देणाऱ्या एका दिव्यांग महिलेला एकाने मारहाण केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एक कोटीहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक केले आहे. पण आपल्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मास्क लावायला सांगणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याला मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून एका दिव्यांग महिलेला मारहाण करण्यात आली. 

मास्क वापरणे सक्तीचे 

सध्या बहुतांश कार्यालये, इतर सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाला अटकाव करणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, हे सक्तीचे केले आहे. जर मास्क नसेल तर दंडही भरावा लागत आहे.

फक्त मास्क लावायला सांगितला म्हणून...

सरकारी कार्यालयात कर्मचारी मास्क घालून आला नाही म्हणून त्याच्यासोबतच काम करणाऱ्या एका दिव्यांग महिला कर्मचाऱ्याने त्याला मास्क घालण्याचा सल्ला दिला. यावरून दोघांमध्ये वादंग निर्माण झाले. या व्यक्तीने रागाच्या भरात महिलेला मारहाण करायला सुरुवात केली.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल 

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील नेल्लोरमध्ये घडली. 

महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून ट्विट

दरम्यान, केवळ मास्क लावण्याच्या विनंतीवरून एका कर्मचाऱ्याने दिव्यांग महिलेवर हल्ला केला. ही अत्यंत लाजिरवाणी घटना आहे, असे ट्विट दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केले.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andhra Pradesh Man assaults female colleague for asking him to wear mask