मतांसाठी उमेदवारांची भन्नाट ऑफर! कुठे २,५०० रुपये, तर कुठे चक्क एक किलो चिकन फ्री; मतदानाच्या दिवशी लोकशाहीचे धिंडवडे!

Andhra Pradesh Elections 2026 : विशेष म्हणजे, एका काँग्रेस उमेदवाराने तर मतदारांना चक्क एक किलो चिकन मोफत देण्याची घोषणा केली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
Andhra Pradesh Elections 2026

Andhra Pradesh Elections 2026

esakal

Updated on: 

आंध्र प्रदेशमध्ये नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. मात्र, मतदानाच्या दिवशीही मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळी आमिषं दाखवली जात आहेत. कुठे मतदारांना पैसे वाटले जात आहेत, तर कुठे महिलांना साड्या आणि इतर वस्तूंचं वाटप केलं जात आहे. विशेष म्हणजे, एका काँग्रेस उमेदवाराने तर मतदारांना चक्क एक किलो चिकन मोफत देण्याची घोषणा केली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...