Jagan Mohan Reddy Video: ‘’चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात’’ ; रेड्डींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

Jagan Mohan Reddy’s Big Claim on Chandrababu Naidu-Rahul Gandhi Contact : ‘’राहुल गांधींसारख्या व्यक्तीवर मी काय भाष्य करू, जे स्वतः..’’ असंही रेड्डींनी म्हटलंय
Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu allegedly in hotline contact with Rahul Gandhi, claims rival leader Jagan Mohan Reddy.
Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu allegedly in hotline contact with Rahul Gandhi, claims rival leader Jagan Mohan Reddy. esakal
Updated on

Chandrababu Naidu in direct hotline contact with Rahul Gandhi claims Jagan Mohan Reddy: आंध्र प्रदेशच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. ज्यामुळे राष्ट्रीय पातळवरील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 जगन मोहन रेड्डी यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, चंद्राबाबू नायडू तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत हॉटलाइनवर राहुल गांधींच्या संपर्कात आहेत. एवढंच नाहीतर ते असेही म्हणाले की, "जेव्हा राहुल गांधी मत चोरीबद्दल बोलतात, तेव्हा ते आंध्र प्रदेशबद्दल विधान का करत नाहीत, जिथे घोषित निकाल आणि मतमोजणीच्या दिवशी मिळालेल्या निकालांमध्ये सर्वाधिक १२.५ टक्के मतांचा फरक आहे. ते अरविंद केजरीवालबद्दल का बोलत नाहीत? अरविंद केजरीवाल स्वतः आमदारकीची निवडणूक हरले. ते तसं करत नाहीत.

याशिवाय ते पुढे म्हणाले, राहुल गांधी आंध्रबद्दल बोलत नाहीत कारण चंद्राबाबू नायडू रेवंत रेड्डी यांच्या माध्यमातून हॉटलाइनवर राहुल गांधींच्या संपर्कात आहेत. राहुल गांधींसारख्या व्यक्तीवर मी काय भाष्य करू, जे स्वतः त्याच्या कामाशी प्रामाणिक नाहीत?

Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu allegedly in hotline contact with Rahul Gandhi, claims rival leader Jagan Mohan Reddy.
India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

याशिवाय जगनमोहन रेड्डी यांनी पुलिवेंदुला आणि वोंटिमिट्टा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंवर लोकशाहीची हानी करण्याचा आरोप केला होता. रेड्डी यांनी आरोप केला की नायडू यांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी षड्यंत्र, हल्ले, अत्याचार, खोटेपणा आणि फसवणुकीचा आधार घेतला.

Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu allegedly in hotline contact with Rahul Gandhi, claims rival leader Jagan Mohan Reddy.
Rahul Gandhi on ECI : ‘’अभी पिक्चर बाकी है’’ ; राहुल गांधींचा निवडणूक आयोगास इशारा!

याशिवाय जगनमोही रेड्डी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये आरोप केला की, नायडू वास्तविक कामांद्वारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याऐवजी, पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांच्या अधिकाराचा वापर करून सत्तेचा गैरवापर करत आहेत". तसेच रेड्डी यांनी असाही आरोप केला की पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर पोलिसांचे अत्याचार सुरू झाले आणि शेकडो पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांना धमकावण्यात आले, ज्यांपैकी अनेकांवर पूर्वी कोणतेही गुन्हे नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com