Rahul Gandhi on ECI : ‘’अभी पिक्चर बाकी है’’ ; राहुल गांधींचा निवडणूक आयोगास इशारा!

Rahul Gandhi targets Election Commission again: निवडणूक आयोगाला माहीत आहे आणि आम्ही देखील जाणतो. आधी आमच्याकडे पुरावे नव्हते, परंतु आता आमच्याकडे पुरावे आहेत, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
Rahul Gandhi’s Allegations Raised Questions on Election Integrity
Rahul Gandhi’s Allegations Raised Questions on Election IntegritySakal
Updated on

Rahul Gandhi’s Fresh Attack on the Election Commission: मत चोरीच्या आरोपानंतर आता राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये SIRच्या मुद्य्यावर राहुल गांधीनी म्हटले की, केवळ एक जागा नाही, अनेक जागा आहेत. हे राष्ट्रीय स्तरावर केले जात आहे आणि व्यवस्थितरित्या केलं जात आहे.

राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोगाला माहीत आहे आणि आम्ही देखील जाणतो. आधी आमच्याकडे पुरावे नव्हते, परंतु आता आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही संविधानाचे रक्षण करत आहोत. एक मतदार एक मत संविधानाचा आधार आहे आणि निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की, एक व्यक्ती, एक मत लागू करावं. परंतु त्यांनी असं काही केलं नाही. आम्ही केवळ संविधानाचे रक्षण करत आहोत आणि करत राहू, थांबणार नाही.

निवडणूक आयोगाद्वारे SIR दरम्यान बिहाराच्या दरौंदामध्ये एक महिला मिंता देवी यांचे वय १२४ वर्षे सांगण्यात आल्यानंतर त्यांनी म्हटले की, अशी अनेक प्रकरणं आहेत, अभी पिक्चर बाकी है.

Rahul Gandhi’s Allegations Raised Questions on Election Integrity
PM Modi and Vladimir Putin: पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना केला फोन अन् 'या' मुद्य्यावर झाली चर्चा!

तसेच समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले  की, भाजपचे सर्वात मोठे काम आहे षडयंत्र रचणे. SIR वर्षभर आधीही आणलं जाऊ शकत होतं. SIRच्या बहाण्याने ते मोठ्याप्रमाणात जनतेचे मत कापू इच्छित आहे. आज निवडणूक आयोग राहुल गांधींना शपथपत्र मागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com