
बापटला जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलीय.
धक्कादायक! गर्भवती महिलेवर पतीसमोरचं नराधमांनी केला सामूहिक बलात्कार
जगात घृणास्पद कृत्य करणार्या क्रूर लोकांची लोक कल्पनाही करू शकत नाहीत. ही घटना ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) बापटला जिल्ह्यात (Bapatla District) अतिशय धक्कादायक घटना समोर आलीय. येथील रेपल्ले रेल्वे स्टेशनवर (Repalle Railway Station) गर्भवती महिलेचा (Pregnant Woman) तिच्या कुटुंबीयांसमोर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आलाय. तीन नराधमांनी हे लाजिरवाणं कृत्य केलंय.
दरम्यान, आरोपींनी महिलेच्या पतीला बेदम मारहाण केलीय. त्यांनी आरडाओरडा करत रेल्वे पोलिसांची (Railway Police) मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना मदत मिळू शकली नाही. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून एका अल्पवयीन मुलासह तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री हे कुटुंब कामाच्या शोधात गुंटूरहून कृष्णा जिल्ह्यात जात असताना ही घटना घडलीय. हे कुटुंब प्रकाशम जिल्ह्यातील आहे.
हेही वाचा: मटण खायला देत नसल्याने मुलाकडून वडिलांचा निर्घृण खून
पोलिसांनी रविवारी सांगितलं की, प्रकाशम जिल्ह्यातील येरागोंडापलेम येथील रहिवासी असलेलं एक जोडपं कृष्णा जिल्ह्यातील नागयलंका गावात शेतीच्या कामासाठी जात असताना शनिवारी रात्री रेपल्ले रेल्वे स्थानकावर ते दोघे रेल्वेतून उतरले. रविवारी सकाळी दोघेही नागयलंकाकडे जाताना फलाटावर झोपले. त्यानंतर तिघेजण तिथं आले आणि त्यांनी महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवरचं महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिघांनी दाम्पत्याकडून पैसे हिसकावून घटनास्थळावरून पळ काढलाय. दरम्यान, मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी (Y. S. Jagan Mohan Reddy) यांनी बापटलाच्या एसपीशी बोलून आरोपींना लवकरात-लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Web Title: Andhra Pradesh Pregnant Woman Gang Rape In Front Of Husband Repalle Railway Station
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..