Video: महिला सहकाऱयाला ऑफिसमध्येच मारहाण

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जून 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहे. एका महिला सहकाऱयाने मास्क वापरण्यास सांगितल्यामुळे चिडलेल्या अधिकाऱयाने ऑफिसमध्येच बेदम मारहाण केली.

हैदराबाद : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहे. एका महिला सहकाऱयाने मास्क वापरण्यास सांगितल्यामुळे चिडलेल्या अधिकाऱयाने ऑफिसमध्येच बेदम मारहाण केली. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Video: पळत आला अन् घातली छातीवर लाथ...

आंध्र प्रदेश पर्यटन विभागाच्या हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सने टीका सुरू केली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मारहाण करणाऱया व्यक्तीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. राज्य शासनानेही आरोपी अधिकाऱ्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

लग्नाच्या दुसऱयाच दिवशी नवरदेवाचा झाला मृत्यू....

आंध्र प्रदेश पर्यटन विभागाच्या हॉटेलमध्ये वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याने उपव्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱयाला मास्क घालण्याचा सल्ला दिला. यामुळे अधिकाऱयाला राग आला आणि मारहाण केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'अधिकाऱयाने महिलेला केस धरुन खेचले आणि हाताला येईल त्या वस्तूने ते बेदम मारहाण केली. शेवटी हाताला लोखंडी रॉड मिळाला, रॉडनेही मारहाण केली. मारहाण होत असताना उपस्थितांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पण, तो न थांबता मारहाण करतच राहिला.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: andhra pradesh tourism department employee beats lady colleague for asking to wear mask