
विवाह सोहळ्यादरम्यान नृत्याचा कार्यक्रम सुरू होता. एक युवती नाचत असताना एक युवक पळत आला आणि तिच्या छातीवर जोरात लाथ मारली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इस्लामाबाद (पाकिस्तान): विवाह सोहळ्यादरम्यान नृत्याचा कार्यक्रम सुरू होता. एक युवती नाचत असताना एक युवक पळत आला आणि तिच्या छातीवर जोरात लाथ मारली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कराची स्टॉक एक्सचेंजवरील हल्ल्याचा Live Video...
विवाह सोहळ्यादरम्यान नाचणाऱ्या युवतीला जोरात लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे कोणालाच काही कळेनासे झाले. मात्र, युवती जोरात खाली पडली. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी टीका सुरू केली आहे.
पाकची युवती म्हणाली; मोदीजी मला लग्न करायचंय...
प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित व्हिडीओ खैबर पख्तूनखा भागातील आहे. महिला लग्नाच्या कार्यक्रमात नृत्य सादर करत होती. यावेळी एक व्यक्ती जोरात पळत आली आणि महिलेच्या छातीवर जोरात लाथ मारली. महिला जोरात खाली पडली. यावेळी त्या व्यक्तीच्या हातात बाटली होती. उपस्थितांनी त्याला पकडले. त्यावेळी त्याने महिला अश्लिल नृत्य करत असल्यामुळे चिडून कृत्य केल्याचे सांगितले. पण, अचानक घडलेल्या या घटनेमुळे लग्नातील वातावरण बदलून गेले.