esakal | लग्नाच्या दुसऱयाच दिवशी नवरदेवाचा झाला मृत्यू अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

groom died next day after wedding and 100 people tested positive at bihar

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. विवाहाच्या दुसऱयाच दिवशी नवरदेवाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली असून, कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शिवाय, विवाहाला उपस्थित असलेल्या 100 पाहुण्यांना कोरोनाने घेरले आहे.

लग्नाच्या दुसऱयाच दिवशी नवरदेवाचा झाला मृत्यू अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पाटणा (बिहार): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. विवाहाच्या दुसऱयाच दिवशी नवरदेवाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली असून, कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शिवाय, विवाहाला उपस्थित असलेल्या 100 पाहुण्यांना कोरोनाने घेरले आहे.

...तरी पण लग्न केले; दुसऱयाच दिवशी मृत्यू

पालीगंज येथे ही घटना घडली आहे. विवाहाच्या दुसऱयाच दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाल्यामुळे नवदांपत्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. शिवाय, 100 पाहुण्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये वधू आणि वर पक्षातील नातेवाईकांचा समावेश आहे. फोटोग्राफर आणि ज्या ठिकाणी लग्न सोहळा झाला त्या ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांची ही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सर्वांचा अहवाल हाती आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

विवाह उत्साहात साजरा पण नवरी ऐवजी होती...

दरम्यान, बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. भारतात 24 तासांत 18 हजार 522 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 66 हजार 840 वर पोहोचला असून, त्यापैकी 2,15,12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 3 लाख 34 हजार 822 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनामुळे मागच्या 24 तासांत 418 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 16 हजार 893 वर पोहोचला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरातमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजारातून रुग्ण बरे होण्याचा आतापर्यंतचा दर 59.6% झाला आहे.

विवाहानंतर सासरी जाताना नवरीला उलटी आली अन्...

loading image