अमित शहांच्या 'हिंदी' ट्विटवरून दक्षिण भारतात संताप!

वृत्तसंस्था
Saturday, 14 September 2019

जर आमच्यावर हिंदी भाषेची सक्ती केली गेली, तर 'हिंदी दिवस' हा कर्नाटकमध्ये काळा दिवस म्हणून साजरा केला जाईल, अशी धमकीच त्यांच्यापैकी एकाने दिली आहे. ​

नवी दिल्ली : भारतात दरवर्षी 14 सप्टेंबरला 'हिंदी दिवस' साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर देशातील शाळा-महाविद्यालये, कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिस अशा सर्वच ठिकाणी हिंदी दिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तर, दुसरीकडे जगभरातील हिंदीचे चाहते 10 जानेवारीला हिंदी दिवस साजरा करतात. हिंदी प्रेमींमध्ये या दोन दिवसांवरून मतभेद दिसत असले तरी देशाच्या दक्षिण भागात मात्र हिंदीला कायम विरोध पाहायला मिळतो. तसा तो आजही सोशल मीडियावर पाहायला मिळाला.

- एअरपोर्टवर व्हिलचेअरवर दिसला 'हा' अभिनेता; चाहत्यांची वाढली चिंता

भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘वन नेशन वन लँग्वेज’चा मुद्दा शनिवारी उपस्थित केला. हिंदी भाषा दिनानिमित्त त्यांनी एक ट्विट केले. त्यानंतर दिवसभर दक्षिणेतील नेटकऱ्यांनी ट्विटरवर हिंदी भाषेविरोधात मोहिम चालवली. तसेच अमित शहा यांनाही ट्रोल केले. सोशल मीडियावर #WeDontWantHindiDivas आणि #WeWantBharatBhashaDivasa हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये होते. ही मोहिम चालविणाऱ्या काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, हिंदी भाषेला देशावर थोपलं गेलं आहे आणि ते आम्हाला मान्य नाही.

- आता ‘वन नेशन वन लँग्वेज’; अमित शहा यांचे ट्विट

एकीकडे केंद्र सरकारकडून 14 सप्टेंबरला 'हिंदी दिवस' साजरा केला जात असताना दुसरीकडे कर्नाटकसह इतर गैर हिंदी भाषिक प्रदेशांकडून याला विरोध दर्शविला. या मोहिमेस पाठिंबा देणारे समर्थक हिंदीच्या विरोधात नाहीत. मात्र, केवळ एका भाषेला मिळणारा विशेष दर्जा आणि एकाच भाषेचा साजरा केला जाणारा दिवस यासाठी त्यांचा विरोध आहे. जर आमच्यावर हिंदी भाषेची सक्ती केली गेली, तर 'हिंदी दिवस' हा कर्नाटकमध्ये काळा दिवस म्हणून साजरा केला जाईल, अशी धमकीच त्यांच्यापैकी एकाने दिली आहे. 

- राजू शेट्टी म्हणतात, 'ईडीमार्फत 'कडकनाथ'ची चौकशी करा, नाहीतर...'

का साजरा केला जातो 'हिंदी दिवस'?
1947 मध्ये इंग्रज राजवटीमधून देश स्वतंत्र झाला, तेव्हा देशाची राजभाषा निवडण्याचा मोठा प्रश्न देशासमोर उभा राहिला. अनेक चर्चा आणि विचार विनिमयानंतर 14 सप्टेंबर 1949 मध्ये हिंदीला देशाची अधिकृत भाषा म्हणून घोषित केले. त्याचवेळी हिंदीसोबत इंग्रजीलादेखील अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला. 

राजेंद्र सिन्हा यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त 14 सप्टेंबर 1949 ला अखेर संविधान समितीने अधिकृत भाषा म्हणून हिंदीला पसंती दिली. 26 जानेवारी 1950 मध्ये भारतीय संविधानासोबतच तो देशभरात लागू करण्यात आला. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी हिंदी दिवसाचं महत्त्व सांगताना 14 सप्टेंबरला 'हिंदी दिवस' साजरा केला जाईल, अशी घोषणा केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anger in South India due to tweet by Amit Shah about Hindi language