बदाम खा! कागदपत्रं कुठं आहेत ते आठवेल; वर्षभरापासून फाईल सापडेना म्हणणाऱ्या अधिकाऱ्यासमोर तरुणाने फेकले बदाम, VIDEO VIRAL

Viral Video सरकारी कार्यालयात मालमत्तेची कागदपत्रं सापडत नसल्याचं कारण सातत्यानं ऐकून संतापलेल्या तरुणाने अधिकाऱ्याच्या टेबलवर अर्धा किलो बदाम फेकत निषेध व्यक्त केला.
Frustrated man uses almonds to mock officer over lost documents in viral office incident

Frustrated man uses almonds to mock officer over lost documents in viral office incident

Esakal

Updated on

सरकारी कार्यालयात कागदपत्रांसाठी सामान्य नागरिकांना अनेकदा नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं. भ्रष्टाचारी आणि उदासीन अधिकाऱ्यांमुळे नागरिकांना सतत सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीला संतापलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची कागदपत्र वर्षभरापासून सापडत नसल्याचं कारण दिलं जात होतं. शेवटी तरुणाने अधिकाऱ्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीनं सुनावलं आहे. तरुणाने थेट अधिकाऱ्याच्या टेबलवर अर्धा किलो बदाम भरलेली पिशवी रिकामी केली आणि हे खा म्हणजे तुम्हाला फाईल कुठं ठेवलीय ते आठवेल असं म्हटलं. तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com