esakal | सनकी फॅन; नितीश कुमार चौथ्यांदा CM झाल्यावर समर्थकाने कापले आपले चौथे बोट
sakal

बोलून बातमी शोधा

anil sharma

मागच्या तीन विजयांपासून नितीश कुमार यांच्या प्रत्येक विजयावर हा व्यक्ती आपल्या हाताचे एकेक बोट बळी देतो आहे.

सनकी फॅन; नितीश कुमार चौथ्यांदा CM झाल्यावर समर्थकाने कापले आपले चौथे बोट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जहानाबाद : आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. अलिकडेच बिहार विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. नितीश कुमार सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. मात्र, नितीश कुमार यांचा असा एक जबरी फॅन आहे ज्याच्याबद्दल ऐकून तुम्ही हैराण व्हाल. हा असा फॅन आहे, ज्याची तुलना थेट 'अंगुलिमाला'शी करता येईल. फरक इतकाच की हा कुणी डाकू नाहीये.  

हेही वाचा - अमित शहा झोपले होते का? रोहिंग्यासंदर्भातील वक्तव्यावर ओवेसींनी दिलं भाजपला चॅलेंज
या निवडणुकीपूर्वी नितीश कुमार तीनवेळा बिहारच्या सत्तेवर आहेत. मागच्या तीन विजयांपासून नितीश कुमार यांच्या प्रत्येक विजयावर हा व्यक्ती आपल्या हाताचे एकेक बोट बळी देतो आहे. आता चौंथ्यांदा नितीश कुमार यांनी शपथ घेतल्यावर या जबरी फॅननेही आपल्या चौथ्या बोटाचा बळी चढवला आहे. आपल्याला हे ऐकून धक्का बसेल, मात्र हे खरंय. 16 नोव्हेंबर रोजी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या या जबरी फॅनने आपले चौथे बोट कापून भगवान गौरेया बाबाला चढवले आहे. ही व्यक्ती बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात राहते. त्यांचं नाव अनिल शर्मा असून ते 45 वर्षांचे आहेत. त्यांना अली बाबा या नावानेही ओळखलं जातं. या अली बाबांनी 2005 मध्ये पहिल्यांदा आपले पहिले बोट कापून गौरेया बाबला चढवलं होतं. याच साली नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपसोबत सरकार बनवलं होतं. 2010 मध्ये त्यांनी दुसरे बोट कापले होते. त्यानंतर 2015 मध्ये नितीश कुमार यांनी महागठबंधनसोबत सरकार बनवलं होतं. त्यावेळी त्यांनी तिसरे बोट कापले होते. त्यानंतर आता 16 नोव्हेंबर रोजीही त्यांनी हेच केलं. 

हेही वाचा - 5 स्टार हॉटेलमधून पार्सल मागवून शहा आदिवासी कुटुंबियांसोबत जेवले, ममता बॅनर्जींचा दावा
अनिल शर्मा यांच्या या सनकीपणाची माहिती नितीश कुमार यांना नसावी. त्यांचं म्हणणं आहे की, जेंव्हा जेंव्हा मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार बसतील तेंव्हा तेंव्हा ते आपली एकेक बोट बळी देतील. आपल्या आवडत्या व्यक्तीच्याबाबतीत आनंद व्यक्त करायची ही सनकी पद्धत बिहारमध्ये चर्चेचा तसेच चिंतेचाही विषय ठरली आहे. 

loading image