esakal | अमित शहा झोपले होते का? रोहिंग्यासंदर्भातील वक्तव्यावर ओवेसींनी दिलं भाजपला चॅलेंज
sakal

बोलून बातमी शोधा

 owaisi, amit shah, bjp, Greater Hyderabad Municipal Corporation

भाजप यूथ विंगचेचे अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी प्रचारादरम्यान  एमआयम पक्षाचे प्रमुख ओवेसी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मताच्या राजकारणासाठी 30 हजार रोहिंग्या मुस्लिमांची नावे मतदार यादीत घातली आहेत, असे तेजस्वी सूर्या यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर ओवेसींनी पलटवार केलाय. तेजस्वी सूर्या यांच्या वक्तव्याचा अर्ध केंद्रीय गृहमंत्री झोपा काढत आहेत, असा घ्यायचा का? जर भाजप खरे बोलत असेल तर पुढील 24 तासांत त्यांनी 1000 रोहिग्यांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान देखील भाजपला दिले.

अमित शहा झोपले होते का? रोहिंग्यासंदर्भातील वक्तव्यावर ओवेसींनी दिलं भाजपला चॅलेंज

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

हैदरदाबादमधील स्थानिक निवडणूकीच्या प्रचारात आरोप-प्रत्योरोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी आपल्या उमेदवाराचा प्रचारादरम्यान भाजपवर पलटवार केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न विचारत त्यांनी रोहिंग्यासंदर्भातील वक्तव्यावरुन भाजपवर निशाणा साधला. एवढेच नाही तर भाजप प्रामाणिक असेल तर त्यांनी दावा केलेल्या 30 हजार रोहिंग्यापैकी केवळ 1000 रोहिंग्याच्या नावाची यादी दाखवावी, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले आहे.  

5 स्टार हॉटेलमधून पार्सल मागवून शहा आदिवासी कुटुंबियांसोबत जेवले, ममता बॅनर्जींचा दावा

भाजप यूथ विंगचेचे अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी प्रचारादरम्यान  एमआयम पक्षाचे प्रमुख ओवेसी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मताच्या राजकारणासाठी 30 हजार रोहिंग्या मुस्लिमांची नावे मतदार यादीत घातली आहेत, असे तेजस्वी सूर्या यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर ओवेसींनी पलटवार केलाय. तेजस्वी सूर्या यांच्या वक्तव्याचा अर्ध केंद्रीय गृहमंत्री झोपा काढत आहेत, असा घ्यायचा का? जर भाजप खरे बोलत असेल तर पुढील 24 तासांत त्यांनी 1000 रोहिग्यांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान देखील भाजपला दिले.

हेही वाचा - भाजप करतंय २०२४ची तयारी; राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनी तयार केलाय प्लॅन

 ग्रेटर हैदराबादमधील स्थानिक निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.  1 डिसेंबरला 150 जागेसाठी मतदान होणार आहे. याठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. दुसरीकडे तेलंगना राष्ट्र समिती TRS आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल. विधानसभा निवडणुकीत ओवेसी यांच्या पक्षाने  टीआरएसची मदत केली होती. मात्र या निवडकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसही याठिकाणी जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे.  2015 मध्ये 150 पैकी 80 जागा TRS ने जिंकल्या होत्या.