५१ जखमा अन् नाल्यात सापडलेला मृतदेह; निर्घृणपणे झाली होती अंकित शर्माची हत्या, नेमकं काय घडलं होतं?

Ankit Sharma Murder Case Verdict : ताहिर हुसेन हा जमावाचा सहभागी होता. या जमावाने हिंसाचार, जाळपोळ आणि हल्ल्यांदरम्यान अंकित शर्मा यांची निर्घृण हत्या केली, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.
Ankit Sharma Murder Case

Ankit Sharma Murder Case

esakal

Updated on

दिल्लीतील २०२० च्या दंगलीदरम्यान आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने आम आदमी पक्षाचा माजी नगरसेवक ताहिर हुसेन आणि अन्य चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ताहिर हुसेन हा जमावाचा सहभागी होता. या जमावाने हिंसाचार, जाळपोळ आणि हल्ल्यांदरम्यान अंकित शर्मा यांची निर्घृण हत्या केली, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. या प्रकरणात ताहिर हुसेनसह जावेद, अनस, कासिम आणि नाझिम यांनाही दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com