

An image showing security officials escorting Anmol Bishnoi outside Patiala House Court after the NIA custody order.
esakal
Overview of Anmol Bishnoi’s NIA Custody: पटियाला हाऊस कोर्टाने गँगस्टर अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे. अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर अटक करण्यात आलेल्या अनमोलला एनआयएने सायंकाळी ५ वाजता पटियाला हाऊस कोर्टात हजर केले होते. एनआयएने अनमोलसाठी १५ दिवसांची कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने त्याला ११ दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले.
तत्पुर्वी दुपारी अडीच वाजता दिल्लीतील विमानतळावर उतरताच एनआयएने अनमोल बिश्नोईला अटक केली होती. अटकेच्या वेळीची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया न्यायालयाला सांगण्यात आली. शिवाय, जुने अटक वॉरंट अनमोलला वाचून दाखवण्यात आले. वॉरंट आणि अटक मेमोची प्रत त्याला देण्यात आली. मेमोची पावती त्याच्याकडून देखील घेण्यात आली आणि अनमोलची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली होती.
एनआयएच्या आरोपांनुसार, अनमोल दहशतवादी आणि गँगस्टर्सच्या मोठ्या कटात सहभागी होता. एनआयएने न्यायालयाला सांगितले की, अनमोल बिश्नोई हा एका क्रिमिनल-टेरर सिंडिकेटचा भाग होता. जो देशांतर्गत आणि परदेशात दहशतवादी कारवायांसाठी पैसा गोळा करत होता आणि तरुणांची भरतीही करत होता. याचबरोबर तो प्रमुख व्यक्तींच्या टार्गेट किलिंगचाही कट रचत होता. तसेच, गुन्हे केल्यानंतर त्याने सोशल मीडियावर त्यांची जाहिरात करून दहशत पसरवली होती.
एनआयएचा दावा आहे की हे संपूर्ण नेटवर्क बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) सारख्या दहशतवादी संघटनांशी जोडलेले आहे आणि त्यांचा उद्देश देशात अस्थिरता आणि भीती पसरवणे आहे. अनमोल पूर्वी फरार होता आणि न्यायालयाने त्याला घोषित गुन्हेगार घोषित केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.