Anna Hazare
esakal
सोनिया गांधी यांच्या 'Belonging: A Journey of Love' या पुस्तकात आपल्या आंदोलनाचा उल्लेख आणि त्यावर करण्यात आलेल्या टीकेबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचं स्पष्ट करत त्यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांपासून आपण अलिप्त असल्याचं सांगितलं. तसेच जबाबदार व्यक्तीने जबाबादारीने बोलावं, असा सल्लाही त्यांनी सोनिया गांधी यांना दिला आहे. आपल्यासाठी राजकारणापेक्षा समाज आणि देशाचं हित महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.