Anna Hazare angry over Pune banner asking him to wake up at 90, gives strong reply : पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आला आहे. 'आता तरी उठा अण्णा, मतांची चोरी झाली आहे,' असं या बॅनरवर लिहिलं आहे. या बॅनरची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. मात्र, यावरून अण्णा हजारे यांनी संताप व्यक्त केला आहे. वयाच्या ९०व्या वर्षीही काम करावं का? असा प्रश्न त्यांनी बॅनर लावणाऱ्यांना विचारला आहे.