

बिहारमधील मोतीहारी येथील एका रेस्टॉरंट मालकाला दूषित चिली पनीर विकणे महागात पडले आहे. रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेल्या एका ग्राहकाला १५० रुपयांना चिली पनीरची प्लेट देण्यात आली. पण तेच चिली पनीर खाल्ल्यानंतर ग्राहक आजारी पडला. यानंतर त्यांनी ग्राहक मंचात रेस्टॉरंट मालकाविरुद्ध तक्रार दाखल केली.