esakal | बच्चन यांच्या आवाजाला वैतागलात? अशी बंद करा कोरोना कॉलर ट्यून
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh-Bachchan

बच्चन यांच्या आवाजाला वैतागलात? अशी बंद करा कोरोना कॉलर ट्यून

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे : ‘नमस्कार, हमारा देश और पुरा विश्व आज कोविड१९से...’ अमिताभ बच्चन किंवा इतर उद्घोषकांच्या आवाजाने आपल्या प्रत्येकाचा कॉल सुरू होतो. तब्बल दीड वर्ष अशा कॉलर ट्यून आपण ऐकतो आहे. त्यामुळे आता सर्वांनाच अशा कॉलरट्यूनमुळे ‘इरिटेड’ होत आहे. यापासून सुटका करून घ्यायची असले तर काही पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

हेही वाचा: चार दिवसांच्या घसरणीनंतर 553 अंशांनी वधारला सेन्सेक्स

एअरटेल, जिओ आणि बीएसएनएल ग्राहकांसाठी कोरोनाची कॉलरट्यून थांबविण्यासाठी एसएमएस आणि मिस्डकॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. एअरटेल ग्राहकांनी मोबाईलच्या किपॅडवर *646*224# असा क्रमांक डायल करून त्यानंतर एक अंक प्रेस करावा. तर जिओ ग्राहकांनी STOP हा संदेश टाइप करून 155223 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर येणाऱ्या संदेशाच्या आधारे पुढील कार्यवाही करावी. तर भारत संचार निगम लिमिटेडच्या ग्राहकांनी UNSUB हा संदेश 56700 किंवा 56799 या क्रमांकावर पाठवावा.

loading image
go to top