Annual Production : संरक्षण क्षेत्राची स्वदेशी भरारी!वार्षिक उत्पादन उच्चांकी पातळीवर

देशाच्या संरक्षण क्षेत्राचे उत्पादन २०२३-२४ या वर्षात विक्रमी १.२७ लाख कोटींवर पोचले असून ‘मेक इन इंडिया’ उपक्रम मैलाचे नवीन दगड ओलांडत आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे दिली.
Annual Production
Annual Productionsakal
Updated on

नवी दिल्ली : देशाच्या संरक्षण क्षेत्राचे उत्पादन २०२३-२४ या वर्षात विक्रमी १.२७ लाख कोटींवर पोचले असून ‘मेक इन इंडिया’ उपक्रम मैलाचे नवीन दगड ओलांडत आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे दिली. त्यापूर्वीच्या वर्षात म्हणजे २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात संरक्षण क्षेत्राचे उत्पादन १, ०८,६८४ कोटी इतके होते, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या पोस्टमध्ये राजनाथसिंह यांनी म्हटले आहे, की संरक्षण उत्पादनात भारताला जगातील आघाडीवरील देश बनविण्यासाठी अधिक अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. संरक्षण मंत्रालयाने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात मूल्याच्या दृष्टीने स्वदेशी संरक्षण उत्पादननिर्मितीत आतापर्यंतची सर्वोच्च वाढ नोंदविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘आत्मनिर्भर’ संकल्पनेवर भर देत सरकारने धोरणे व उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करत संरक्षण मंत्रालयाने ही कामगिरी केली. या विक्रमी कामगिरीबद्दल संरक्षणमंत्र्यांनी सार्वजनिक तसेच खासगी संरक्षण उत्पादन कंपन्यांचेही अभिनंदन केले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एकूण मूल्याच्या बाबतीत सार्वजनिक तसेच खासगी कंपन्यांनीही संरक्षण साहित्याच्या उत्पादनात स्थिर वाढ नोंदविली. देशाला स्वावलंबी बनविण्यासाठी गेल्या १० वर्षांत सरकारने ‘ईज ऑफ डूईंग बिझनेस’ सह आखलेल्या अन्य योजना आणि धोरणात्मक सुधारणांमुळे संरक्षण क्षेत्राला हा मैलाचा दगड गाठता आला आहे. स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांचा सातत्याने पाठपुरावा केला जात असून त्यामुळे संरक्षण क्षेत्रात सर्वोच्च उत्पादन शक्य झाले. त्याचप्रमाणे, वाढत्या संरक्षण निर्यातीने स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या एकूण वाढीत मोठे योगदान दिले आहे, असेही संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘मेक इन इंडिया’ उपक्रम वर्षानुवर्षे नवीन टप्पे ओलांडत आहे. संरक्षण उत्पादनाचे एकूण निर्मितिमूल्य २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात १,२६, ८८७ कोटींवर गेले असून यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ते १६.८ टक्क्यांनी अधिक आहे.

-राजनाथसिंह, संरक्षणमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.