Rahul Gandhi: भाजपला आणखी एक धक्का; माजी आमदाराची राहुल गांधींच्या उपस्थितीत झाली कॉंग्रेस पक्षात घरवापसी !

BJP news
BJP news

BJP News: तेलंगणात येत्या ३० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना पुन्हा भाजपला धक्का बसला आहे. माजी खासदार जी. विवेक वेंकटस्वामी यांनी पक्षाचा राजीनामा देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विवेक हे भाजपच्या तेलंगण प्रदेशच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष देखील हेाते. वेंकटस्वामी यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

BJP news
BJP : 'या' प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग नसेल, तर राजीनामा देईन; भाजप आमदाराचं मोठं विधान, अमित शहांची घेणार भेट

वेगळ्या तेलंगण राज्यासाठी उभारलेल्या आंदेालनादरम्यान विवेक हे कॉंग्रेसमध्ये हेाते. कॉंग्रेसच्या खासदारांनी तेलंगणसाठीचे ध्येय गाठण्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण विवेक यांनी केली. त्यांनी सांगितले, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या तत्कालिन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तेलंगणच्या जनतेच्या आशा आणि आकांक्षांचा आदर करत तेलंगण राज्याची मागणी पूर्ण केली हेाती. मात्र राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील अशा अपेक्षा होत्या. परंतु तसे घडले नाही, असा आरोपही विवेक यांनी केला.

बीआरएसच्या नेतृत्वाखालील सरकार हे जनतेसाठी नाही तर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कुटुंबीयांसाठी काम करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. जनतेचा अनादर करणाऱ्या बीआरएस सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. तेलंगण प्रदेशचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना तेलंगणातील बीआरएसचा पराभव होईल, असा दावा केला. विवेक यांचे कॉंग्रेस पक्षात स्वागत आहे, असेही ते म्हणाले.

गेल्याच आठवड्यात भाजपचे ज्येष्ठ नेते कोमाटि रेड्डी राज गोपाल रेड्डी यांनी भाजपचा राजीनामा देत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. गेल्यावर्षी मुनुगोड विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून ते लढले होते. मात्र ते पराभूत झाले होते.

BJP news
BJP Crisis: CM शिवराजसिंह चौहानांविरोधातील असंतोष दूर करण्यासाठी खुद्द अमित शाहा मैदानात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com