Vidhan Sabha Election: बडा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजपला मोठा धक्का!

Congress BJP
Congress BJPsakal

Komatireddy Raj Gopal Reddy : तेलंगणमध्ये विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपला मोठ्या धक्का बसला आहे. याचे कारण म्हणजे, भाजप नेते कोमाटिरेडी राजगोपाल रेड्डी यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आणि ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे म्हटले जात आहे.

भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये रेड्डी यांचे नाव नसल्याने अनेक तर्क लावले जात होते. त्यानुसार रेड्डी यांनी बुधवारी भाजपला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली. रेड्डी यांनी २०१८मध्ये काँग्रेसकडून मुनगोड़ा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती.

Congress BJP
Maharastra Politics : अजितदादांमुळे अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलेल

या निवडणुकीत वे विजयी झाले होते. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मागीलवर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनाा पराभवाला सामोरे जावे लागले होते.

भाजपला सोडचिठ्ठी देण्याबाबत त्यांनी माहिती देताना ते सांगितले की, "माझ्या कार्यकत्यांच्या इच्छेनुसार मी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत आहे.". तेलंगणात येत्या ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. बीआरएस, कॉंग्रेस आणि भाजप अशी त्रिकोणी लढत तेलंगणात होत आहे. तेलंगणात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर आहे. निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत.

काँग्रेसची दुसरी यादीही तयार नवी

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये तेलंगणातील दुसऱ्या यादीतील नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह निवडणूक समितीमधील सदस्य आणि तेलंगणमधील प्रमुख नेते उपस्थित होते. ११९ विधानसभा मतदार संघ असलेल्या तेलंगणमध्ये काँग्रेसने आतापर्यंत ५५ उमेदवारांची नावे घोषीत केली आहेत.

Congress BJP
Bjp Vs Congress: नक्षलवाद मोडण्यात केंद्राचे योगदान नाही; काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा दावा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com