
Priyanka Kadam Viral Video: महाराष्ट्रात पूजा खेडकर प्रकरणानं नुकतंच वादळ येऊन गेलेलं असताना आता लोकसेवा आयोगातील महिला अधिकाऱ्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिव्यांग कोट्यातून अधिकारी झालेल्या या महिला अधिकाऱ्यानं चक्क सैराटच्या गाण्यावर ठुमके लगावले आहेत. यापूर्वीही अनेक कार्यक्रमांमध्ये या महिला अधिकाऱ्यानं डान्स केल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. त्यामुळं प्रशासकीय सेवांमध्ये होणाऱ्या भरतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सामटीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.