उत्तर प्रदेशला येत्या दोन दिवसांत बसणार वादळाचा तडाखा ; हवामान खाते

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

उत्तर प्रदेशमध्ये येत्या दोन दिवसांत वादळाचा तडाखा बसणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये येत्या दोन दिवसांत वादळाचा तडाखा बसणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

उत्तर प्रदेशच्या फतेहगडमध्ये सर्वात उच्चांकी 43.7 तापमानाची नोंद झाली आहे. तसेच बुधवारी आलेल्या या वादळात 15 जणांचा मृत्यू झाला तर 28 जण जखमी झाले. त्यानंतर आता येत्या दोन दिवसांत उत्तर प्रदेशच्या काही भागात मोठ्या वादळाचा तडाखा बसणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला. यापूर्वी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 17 जणांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले. तसेच यादरम्यान झाडे आणि घरांची मोठी पडझड झाली होती. 

Web Title: Another storm in Uttar Pradesh likely in the next two days say MeT department