सेक्स न करता बिग बॉसमध्ये 100 दिवस कशी राहशील?

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जुलै 2019

या सगळ्या प्रकारानंतर अभिनेत्री गायत्री गुप्ताने 'बिग बॉस' आयोजकांविरोधात हैदराबाद येथील बंजारा हिल्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या आधीही लैंगिक छळाप्रकरणी 'बिग बॉस' आयोजकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

हैदराबाद : सध्या बिग बॉसमध्ये वादग्रस्त प्रकार होत असून, बिग बॉस शोमध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री गायत्री गुप्ताला बिग बॉस समन्वयकाने 'सेक्स न करता 100 दिवस कशी राहशील' अशी धक्कादायक विचारणा केल्याने या अभिनेत्रीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हा सगळा प्रकार मराठी बिग बॉस मध्ये नाही तर तेलुगू भाषेत सुरु असलेल्या 'बिग बॉस' मध्ये झाला आहे.

सध्या भारतातील काही भाषांमध्ये लोकप्रिय असलेला 'बिग बॉस' शो चांगलाच गाजत आहे. वादग्रस्त व्यक्ती आणि शो मध्ये होणारे भांडण यावरून 'बिग बॉस' नेहमीच चर्चेत असतो. असाच वादग्रस्त प्रकार तेलुगू भाषेत सुरु असलेल्या 'बिग बॉस'मध्ये घडला असून अभिनेत्री गायत्री गुप्ताला स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी बिग बॉस समन्वयकाने ''सेक्स न करता १०० दिवस राहशील का? असा प्रश्न केला होता, असा आरोप अभिनेत्री गायत्री गुप्ताने केला आहे.

या सगळ्या प्रकारानंतर अभिनेत्री गायत्री गुप्ताने 'बिग बॉस' आयोजकांविरोधात हैदराबाद येथील बंजारा हिल्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या आधीही लैंगिक छळाप्रकरणी 'बिग बॉस' आयोजकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: another woman goes cops alleging harassment bigg boss telugu organisers