काश्‍मीरमध्ये खेळाडूंनी गायले पाकव्याप्त काश्‍मीरचे गीत

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

श्रीनगर: दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा येथील एका स्टेडियमध्ये क्रिकेटच्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरचे गीत म्हटल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. हे गीत फेसबुकवरदेखील लाइव्ह करण्यात आले होते. हा प्रकार रविवारी घडला असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची पोलिसांनी दखल घेतली असून, चौकशी सुरू केली आहे.

दाखवलेल्या व्हिडिओत दोन्ही संघ निळ्या जर्सीत असल्याचे दिसतात. त्यात पॅम्पोरचे शायनिंग स्टार आणि पुलवामा टायगर्सचे खेळाडू पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरचे गीत "वतन हमारा, आझाद काश्‍मीर' म्हणताना दिसून येतात. पुलवामा ज्या स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला होता, त्याच्या बाजूलाच पुलवामाचे डिग्री कॉलेज आहे. काश्‍मीर खोऱ्यात विद्यार्थ्यांचे सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचे केंद्रबिंदू म्हणून या कॉलेजकडे पाहिले जाते. या स्टेडियमजवळच करिमाबाद गाव असून, तो दहशतवाद्यांचा गड मानला जातो. या ठिकाणी केवळ पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरचे गीत म्हटले नाही तर मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे पोस्टरही लावण्यात आले होते. याठिकाणी त्यांच्या नावाने पुरस्कारही देण्यात आले. हे प्रकरण उघड झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

यापूर्वीही व्हिडिओ व्हायरल
दीड महिन्यापूर्वी मध्य काश्‍मीरमध्ये कंगन जिल्ह्यात दोन स्थानिक क्रिकेट संघात सामना होण्यापूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रगीत म्हटल्याचा प्रकार उघड झाला होता. यातील एका संघाने हिरव्या रंगाचा पाकिस्तानच्या खेळाडूप्रमाणे जर्सी घातला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Web Title: Anthem of Pakistan-administered Kashmir played ahead of cricket match in Pulwama