भाजप विरोधी आघाडीसाठी पवार-ठाकरेंच्या पुढाकाराची ममतांची इच्छा

शरद पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
politics
politicsgoogle
Updated on
Summary

शरद पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सध्या राजकीय वातावरणात अनेक बदल पहायला मिळत आहेत. अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर आता सर्व पक्षातील दिग्गजांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आता ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी पहिलं पाऊल महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य कर्नाटकात ठेवलं आहे. दरम्यान शरद पवार बेंगळुरू येथे पोहचले असता त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आले आहे. पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान त्यांनी देशपातळीवर भाजप विरोधी आघाडी उभारण्याबाबत खूप मोठे विधान केले आहे. (Sharad Pawar Latest Breaking News)

यावेळी ते म्हणाले, राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधी आघाडी उभारण्यासाठी लवकरच पावले टाकली जातील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. भाजपच्या विरोधातील पक्षांची मोट बांधण्यासाठी बैठक घ्यावी, अशी इच्छा अनेक नेत्यांची आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर आम्हाला तसे लेखी कळवले आहे. याचा पुढाकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यावर आम्ही विचार करत आहोत. इतर नेत्यांशी बोलून आम्ही अंतिम निर्णय घेऊ. मात्र याची कोणतीही तारीख अद्याप ठरलेली नाही', असे पवार यांनी स्पष्ट केलं केलं आहे.

politics
पुढील अर्ध्या तासात कारवाई झाली नाहीतर.., पोलखोल प्रकरणावरून दरेकरांचा इशारा

देशातील राजकीय वातावरणातील बदल आणि आरोपप्रत्यारोप याविषयी विचारेल असता ते म्हणाले, आज देशात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जात आहे. तो प्रयत्न हाणून पाडण्याची गरज आहे. त्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची व समभाव कसा राहील हे पाहण्याची आवश्यकता आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल यांच्या किमती वाढत आहेत. त्या सामान्य माणसाला त्रासदायक आहेत. आज त्याही प्रश्नावर जनमत तयार करावे लागणार असून त्यासाठी विरोधकांचा ऐक्य महत्त्वाचे ठरणार असल्याचेही पवारांनी सांगितले आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विजयी घोडदौड रोखायची असेल तर शरद पवार हाच योग्य पर्याय असेल, असे देशातील अनेक प्रादेशिक पक्षांचे मत आहे. त्यातूनच युपीएची पुनर्बांधणी करून त्याचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे दिले जावे, अशी मागणी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज परत एकदा महत्त्वाचे मत नोंदवले आहे.

politics
राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, अयोध्या दौऱ्यासाठी दानवेंना पत्र?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com