
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून ‘अँटी टेरर फोरम’तर्फे गुरुवारी पाक उच्चायुक्त कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तान मुर्दाबाद आणि पाकिस्तानात घुसून मारले जाईल, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्तेही सामील झाले होते.