Anti Terrorism Day: दरवर्षी २१ मे ला साजरा होणार दहशतवाद विरोधी दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

home ministry

Anti Terrorism Day: दरवर्षी २१ मे ला साजरा होणार दहशतवाद विरोधी दिन

नवी दिल्ली : देशात आता दहशतवाद विरोधी दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यासंबंधी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. गृहमंत्रालयाकडून पाठवण्यात आलेल्या या पत्रात २१ मे रोजी दहशतवाद विरोध दिन साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. हे पत्र राजांच्या मुख्य सचिव तसेच सर्व मंत्रालयाच्या आणि विभागाच्या सचिवांना पाठवण्यात आले आहे.

(Anti Terrorism Day Will Celebrate on 21 May Every Year)

हेही वाचा: 'अशी सभा पुन्हा...'; बीकेसी मैदानावरंच अनिल परब म्हणाले

भारतातील युवकांना दहशतवाद आणि हिंसेपासून दूर ठेवण्याचा उद्देश हा दिन साजरा करण्यामागे आहे. दहशतवादाला संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. सरकारने यासाठी कोणकोणत्या योजना राबवल्या आहेत आणि युवकांनी केलेली चूक कशा प्रकारे राष्ट्रीय समस्या बनू शकते असं यादिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगण्यात येणार आहे. तसेच यामुळे युवक योग्य मार्गाने गेले तर देशातील दहशतवाद आपोआप संपण्यासाठी मदत होणार आहे असंही या पत्रात म्हटलंय.

हेही वाचा: 'गुडबाय आणि गुडलक काँग्रेस'; पंजाबचे सुनील जाखर यांचा पक्षाला रामराम

सर्व सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी यादिवशी दहशतवादविरोधी शपथ दिली जाणार आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवाद विरोधी मेसेज प्रसारित करण्यात येणार असल्याचं पत्रात म्हटलं आहे. दरम्यान देशातील काही सरकारी कार्यालयांना २१ मे रोजी शनिवार असल्याने सुट्टी असते. अशा ठिकाणी सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी २० मे म्हणजे शुक्रवारी शपथ देण्यात येईल आणि जे कार्यालय शनिवारी चालू असतील त्या कार्यालयात २१ मे ला शपथ होणार आहे असंही या पत्रात नमूद केलं आहे.

दरम्या यावर्षीपासून २१ मे राजी दहशतवाद विरोधी दिन म्हणून देशात साजरा करण्यात येणार आहे.

Web Title: Anti Terrorism Day Will Celebrate On 21 May Every Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top