
'अशी सभा पुन्हा...'; बीकेसी मैदानावरंच अनिल परब म्हणाले
मुंबई : मुंबईत शिवसेनेची जाहीर सभा आज होणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. 'खऱ्या हिंदुत्वाचा आवाज ऐकायला या' असं आवाहन शिवसेनेने केलं आहे. शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू आहे यामध्ये सर्व वरिष्ठ पदाधिकारी गावोगावी फिरत आहेत असं शिवसेनेचे अनिल परब म्हणाले आहेत. आज होणाऱ्या सभेच्या ठिकाणावरून (बीकेसी मैदान) ते बोलत होते.
(Anil Parab On Shivsena Sabha)
शिवसेनेने जनसंपर्क अभियान सुरू केलं असून जनजागृती करण्यासाठी लोकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. याच जनसंपर्क अभियानाचा भाग म्हणून आजची ही सभा होणार आहे. ८ जूनला शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. त्यादिवशी औरंगाबादला शिवेसेनेची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील कार्यक्रम जाहीर होतील असं परब बोलताना म्हणाले आहेत. दरम्यान महाराष्ट्रभर लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू राहणार असून कुठे कुठे सभा घ्यायच्या आहेत हे शिवसेना पक्षप्रमुख ठरवतील असं अनिल परब बोलताना म्हणाले.
हेही वाचा: राज्याभिषेकानंतर १५ दिवसांतच संभाजी महाराजांनी औरंगाबादवर हल्ला केला होता
"आपली नजर पुरणार नाही इतक्या खुर्च्या इथे लावल्या आहेत. अशी सभा पुन्हा होणे नाही, अतिभव्य सभा होणार आहे, एवढी मोठी सभा घेण्याची हिम्मत कोणी तरी दाखवावी." असं म्हणत परब म्हणाले की, यातून जे काही उत्तर जाईल त्याला कोणी टोमणा म्हणेल, अजून काही म्हणेल पण शिवसेना आपली भूमिका मांडणार आहे." असं ते आजच्या सभेबद्दल बोलताना म्हणाले. तसेच निवडणुका आल्या म्हणून ही तयारी आहे का या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, "निवडणुकीची वेळ जर जवळ येऊन ठेपली आली आहे तर ही निवडणुकीची तयारी आहे असं समजा." परब म्हणाले.
हेही वाचा: 'गुडबाय आणि गुडलक काँग्रेस'; पंजाबचे सुनील जाखर यांचा पक्षाला रामराम
"हनुमान चालीसा वाचायला हवी मात्र ती कुठे वाचायला हवी हे ठरवायला हवं. दुसऱ्याच्या घरात जाऊन हनुमान चालीसा वाचन हा गुन्हा आहे." असं म्हणत त्यांनी राणा दाम्पत्यावर टोला लावला आहे. दरम्यान आज मुंबईतील बीकेसी मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे.
Web Title: Anil Parab Shivsena Bkc Ground Uddhav Thackeray Sabha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..