
'गुडबाय आणि गुडलक काँग्रेस'; पंजाबचे सुनील जाखर यांचा पक्षाला रामराम
चंदीगढ : काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने ताशरे ओढल्यानंतर पंजाबमधील माजी काँग्रेसप्रमुख सुनील जाखर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. 'मन की बात' नावाने फेसबुक लाईव्ह करत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला "गुडबाय आणि गुडलक काँग्रेस" असं म्हणत पक्षाचा निरोप घेतला.
(Punjab Former Congress Chief Sunil Jakhar Left Party)
सुनील जाखर हे तीन वेळा आमदार आणि एक वेळा खासदार होते. पक्षाने आपल्यावर ताशेरे ओढल्यानंतर पक्षाचा निरोप घेत पक्षाच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून बाहेर पडले आहेत. तसेच त्यांनी आपल्या ट्वीटरच्या बायोमधून पक्षाचं नाव आणि पक्षाचा फोटोही काढून टाकला आहे.
हेही वाचा: राज्याभिषेकानंतर १५ दिवसांतच संभाजी महाराजांनी औरंगाबादवर हल्ला केला होता
पंजाब काँग्रेसच्या काही नेत्यांनी आपल्यावर केलेल्या पक्षविरोधी कारवायांच्या आरोपानंतर शिस्तपालन समितीने आपल्याकडील सर्व पदे काढून घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यादरम्यान पंजाबमध्ये हिंदू मुख्यमंत्री असण्याचे हे परिणाम आहेत असं वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस खासदार अंबिका सोनी यांच्या विधानावर त्यांनी आक्षेप घेतला होता.
त्यानंतर पक्षाच्या शिस्तपालन समितीने त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यामुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्ष सोडत असताना काँग्रेसच्या राहुल गांधी यांची चांगली व्यक्ती म्हणून प्रशंसा केली आहे. दरम्यान त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून "गुडलक आणि गुडबाय काँग्रेस" म्हणत पक्षाचा निरोप घेतला आहे.
हेही वाचा: Taj Mahal: ताजमहाल कोणाचा? मुघलांचा की राजपुतांचा?
आपल्याकडे असलेल्या पक्षाच्या सर्व सोशल मीडियामधून ते बाहेर पडले असून आपल्या ट्वीटरवरून पक्षाचा फोटोही हटवला आहे. तसेच त्यांनी ट्वीटरच्या बायोमधून पक्षाची माहिती काढून टाकली आहे.
Web Title: Punjab Former Congress Chief Sunil Jakhad Left Party
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..