esakal | अँटीजेन, आरटी-पीसीआर टेस्टची पुन्हा गरज नाही : ICMR

बोलून बातमी शोधा

RT-PCR Test

देशभरात कोरोनाचा कहर माजला असताना चाचण्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. देशातील सर्व लॅबमध्ये दिवसाला सुमारे पंधरा लाख चाचण्या होऊ शकतात.

अँटीजेन, आरटी-पीसीआर टेस्टची पुन्हा गरज नाही
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

Fight with Corona : नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीला ‘रॅपिड अँटीजेन’ (Rapid Antigen Test) वा ‘आरटी-पीसीआर’ (RT-PCR) चाचणीमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे (Covid-19 Positive) आढळल्यास, त्याची पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. तसेच कोरोना रुग्ण बरा झाल्यास रुग्णालय सोडतानाही पुन्हा चाचणीची गरज नाही, अशा सूचना भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आज जारी केल्या.

हेही वाचा: मराठा आरक्षणाबाबत आज अंतिम निकाल देण्याची शक्यता

देशभरात कोरोनाचा कहर माजला असताना चाचण्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. देशातील सर्व लॅबमध्ये दिवसाला सुमारे पंधरा लाख चाचण्या होऊ शकतात. मात्र, या प्रयोगशाळांमध्ये येणाऱ्या स्वॅब नमुन्यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे प्रयोगशाळांवर चाचण्यांचा पडणारा ताण कमी करण्यासाठी ‘आयसीएमआर’ने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

देशांतर्गत आंतरराज्य प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींना ‘आरटी-पीसीआर’ चाचणीचे घातलेले बंधन पूर्णतः: रद्द करता येईल. कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांनी प्रवास करताना सर्व नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. मोबाईल टेस्टिंग लॅब आता उपलब्ध झालेल्या आहेत. राज्यांनी त्याच्या वापरासाठी प्रोत्साहन द्यावे, असे त्यात म्हटले आहे.

हेही वाचा: शाळांनी शुल्क कमी करायलाच हवे; सर्वोच्च न्यायालयाची सूचना

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चाचण्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्यास संसर्गाचे निदान लवकर होऊन रुग्णाला तातडीने उपचार देता येतील. त्यामुळे सर्व सरकारी आणि खासगी वैद्यकीय आस्थापनांमध्ये या चाचण्या करण्यास परवानगी द्यावी. या चाचण्यांची ठिकाणी नागरिकांना सहज जाता यावे. यासाठी शहर, गाव-खेड्यांमध्ये रॅपिड अँटीजेन बूथ सुरू करावेत. शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्र आणि इतर मोकळ्या जागांमध्ये हे बूथ सरू करता येतील. मात्र, त्या ठिकाणी चाचण्यांसाठी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे परिषदेने सुचविले आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.