Ahmedabad Fire
देश
Video: अपार्टमेंटला भीषण आग! रहिवाशांनी लहान मुलांसह फ्लॅटमधून खाली टाकल्या उड्या! भीषण दृश्ये आली समोर
या आगीमुळं मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट निर्माण झाले होते.Gujarat
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील खोखरा भागात एका अपार्टमेंटला भीषण आग लागली आहे. या आगीमुळं मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट निर्माण झाले होते. त्यामुळं इथल्या रहिवाशांनी भीतीपोटी आपल्या फ्लॅटमधून खाली उड्या टाकल्या. काहींनी तर आपल्या लहान लेकांना घेऊन खिडक्यांमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे खाली इतर काही लोकांनी त्यांना चादरींच्या मार्फत झेलल्याचंही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. याचा दुर्घटनेचा व्हिडिओ आणि भयानक दृश्येही समोर आली आहेत.

