
Tahawwur Rana Shocking Reveals: अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झालेला मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा हा मुंबई प्रमाणंच भारतातील इतरही शहरांमध्ये हल्ल्याचं कट-कारस्थान करत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तहव्वूर राणा काल भारतात दाखल झाल्यानंतर राष्ट्रीय तपास एजन्सी अर्थात एनआयएनं त्याला त्याचा ताबा घेतला होता. त्यानंतर काल रात्री उशीरा त्याला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात दाखल करण्यात आलं. यावेळी कोर्टात राणा यानं इतर ठिकाणच्या हल्ल्याच्या कारस्थानची कबुली दिली आहे.