Mazi Ladki Bahin Yojana : राज्यात अर्धा कोटी ‘लाडक्या बहिणीं’चे अर्ज;३१ जुलैपर्यंत अर्ज करणाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू झाली असून ४ ते ९ जुलै या सहा दिवसात सोलापूर जिल्ह्यातील २४ हजार महिलांनी ऑफलाइन तर अंदाजे ३२ हजार महिलांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. तर राज्यातील अर्जदार लाडक्या बहिणींची संख्या आता ४९ लाखांवर पोचली आहे.
Mazi Ladki Bahin Yojana
Mazi Ladki Bahin Yojanasakal
Updated on

सोलापूर : मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू झाली असून ४ ते ९ जुलै या सहा दिवसात सोलापूर जिल्ह्यातील २४ हजार महिलांनी ऑफलाइन तर अंदाजे ३२ हजार महिलांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. तर राज्यातील अर्जदार लाडक्या बहिणींची संख्या आता ४९ लाखांवर पोचली आहे.

राज्य शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना १ जुलैपासून दिला जाणार असून प्रतिमहा दीड हजार रूपये त्या महिलांच्या खात्यात थेट जमा होणार आहेत. दुसरीकडे योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत देण्यात आली असून १५ ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना पहिल्या टप्प्यात तर १ ते ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या सर्वांना दुसऱ्या टप्प्यात लाभ दिला जाईल, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. पण, विधानसभा आचारसंहितेपूर्वी अर्जदार सर्वच लाडक्या बहिणींना योजनेच्या लाभाची रक्कम वितरीत करण्याचेही नियोजन आहे.

पालकमंत्र्यांची शिफारस महत्त्वाची

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या संनियंत्रणासाठी व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामीणमध्ये तालुकास्तरीय तर शहरात वॉर्डनिहाय समित्या नेमल्या जाणार आहेत. या समितीचे अध्यक्ष अशासकीय सदस्यच असणार असून त्यांच्याशिवाय दोन सदस्य देखील अशासकीयच असणार आहेत. अजूनपर्यंत अशासकीय सदस्यांची नावे तहसीलदारांपर्यंत पोचलेली नाहीत. पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार अशासकीय सदस्य निश्चित होणार आहेत. समितीत समावेश व्हावा म्हणून अनेकजण आमदारांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. कारण, समितीच्या माध्यमातून आगामी महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची त्यांना पायाभरणी करता येणार आहे.

आचारसंहितेपूर्वी लाभ

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी योजनेचा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याची लगबग सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे महिलांना ऑफलाइन देखील अर्ज करायला सांगण्यात आले असून ते अर्ज अंगणवाडी सेविकांसह महा ई सेवा केंद्रचालक व अन्य घटकांकडून ऑनलाइन भरून घेतले जात आहेत. त्याची पडताळणी झाल्यानंतर यादी अंतिम करून लाभ जमा केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.