ईशनिंदेला शिरच्छेदाची शिक्षा हे मदरशांचंच शिक्षण : अरिफ मोहम्मद खान

Arif Mohammad Khan presented a question on education in madrassas
Arif Mohammad Khan presented a question on education in madrassasArif Mohammad Khan presented a question on education in madrassas

तिरुअनंतपुरम : उदयपूरमध्ये कन्हैयालालच्या निर्घृण हत्येनंतर देशभरात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. या घटनेवर देशभरातील राजकीय पक्षांनी चिंता व्यक्त करीत तीव्र निषेध केला. ‘मदरशांमध्ये (madrassas) शिकवले जाते की ईशनिंदेची शिक्षा शिरच्छेद आहे. तो देवाचा नियम म्हणून शिकवला जातो. तिथे काय शिकवले जाते, याची चौकशी व्हायला हवी. ज्या प्रकारची घटना घडली आहे ती इस्लामची शिकवण असू शकत नाही’, असे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) म्हणाले. (Arif Mohammad Khan presented a question on education in madrassas)

मदरशांमध्ये अशा काही गोष्टी शिकवले (education) जात आहेत की असे लोक तयार होत आहेत. लक्षणे समोर आल्यावर आपण काळजी घेतो. परंतु, खोलवरचा आजार समजून घेण्यास नकार देतो. मदरशांमध्ये (madrassas) मुलांना हे शिकवण्याची (education) गरज आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे. देशात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आहे. अशा परिस्थितीत मुलांना मदरशांमध्ये शिकवण्याऐवजी शाळेत पाठवावे, असेही आरिफ मोहम्मद खान म्हणाले.

बालपण हे कच्चे असते. या वयात असे धर्मांध शिक्षण देऊ नये. उदयपूरची घटना धक्का देणारी आहे. ही घटना जातीयवाद माणसातील चांगुलपणाचा शेवटचा औंस पुसून टाकेल याची आठवण करून देणारी असल्याचे आरिफ मोहम्मद खान म्हणाले. जातीय अतिरेकी वाढणे हे देशापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे, असा इशारा त्यांनी (Arif Mohammad Khan) दिला.

Arif Mohammad Khan presented a question on education in madrassas
शरीरावर २६ वार, मानेवर १० खोल जखमा; कन्हैयालालचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

जातीयवादाशी लढण्याची वेळ आली

जातीयवादाशी लढण्याची वेळ आली आहे. एका जातीयवादाचे उत्तर दुसऱ्या बाजूचा जातीयवाद असू शकत नाही, असे आरिफ मोहम्मद खान म्हणाले. उदयपूरमध्ये मंगळवारी (ता. २९) भरदिवसा दुकानदार कन्हैयालाल याची हत्या केल्याने शहरात तणावाचे वातावरण आहे. दोघांनी कन्हैयालालचा गळा चिरून खून केला. तसेच व्हिडिओ रेकॉर्ड केला. पोलिसांनी मंगळवारी रात्री राजसमंद जिल्ह्यातील भीम परिसरातून दोघांना अटक केली.

मान शरीरापासून वेगळी करण्याचा प्रयत्न

नराधमांनी कन्हैयालालवर (Kanhaiya Lal) धारदार शस्त्रांनी २६ वार केले होते. त्याच्या शरीरावर १३ खोल जखमा आढळल्या. यापैकी बहुतांश गळ्याभोवती होत्या. मान शरीरापासून वेगळी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे शवविच्छेदन अहवालानंतर (Post Mortem report) सांगण्यात येत आहे. नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यानंतर कट्टरवाद्यांनी कन्हैयालालला धमकावून हत्येची घोषणा केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com