लष्करप्रमुखांची पूर्व लडाखला भेट

पीटीआय
Thursday, 24 December 2020

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी पूर्व लडाखमधील उंचीवरील प्रदेशाला भेट देऊन भारताच्या एकूण लष्करी सज्जतेचा आढावा घेतला. गेल्या काही महिन्यांपासून चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दौरा केला. लष्करप्रमुखांनी रेचिन ला सह इतर उंचीवरील ठिकाणांना भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) चौक्यांना भेट दिली. त्याचप्रमाणे, एलएसीवरील परिस्थितीचीही पाहणी केली.

नवी दिल्ली - लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी पूर्व लडाखमधील उंचीवरील प्रदेशाला भेट देऊन भारताच्या एकूण लष्करी सज्जतेचा आढावा घेतला. गेल्या काही महिन्यांपासून चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दौरा केला. लष्करप्रमुखांनी रेचिन ला सह इतर उंचीवरील ठिकाणांना भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) चौक्यांना भेट दिली. त्याचप्रमाणे, एलएसीवरील परिस्थितीचीही पाहणी केली. 

जेटलींच्या पुतळ्यावरून बेदींचा लेटरबाँब; DDCA चे सदस्यत्व सोडल्याची घोषणा

पूर्व लडाखमध्ये दुर्गम पर्वतमय प्रदेशात भारतीय लष्कराचे ५० हजार जवान तैनात आहेत. चीननेही तितकेच जवान तैनात केले आहेत. बुधवारी सकाळी साडेआठलाच लष्करप्रमुखांचे लेहच्या एक दिवसीय दौऱ्यासाठी आगमन झाले. लेहमधील तुकडीचे कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी पूर्व लडाख परिसरातील परिस्थितीची माहिती लष्करप्रमुखांना दिली. नरवणे यांनी या परिसरातील जवानांशीही संवाद साधला. त्याच उत्साहाने काम सुरू ठेवण्याचे सांगत जवानांना प्रोत्साहित केले. त्यांनी नाताळनिमित्त मिठाई व केकही दिला. लष्कराने ट्विटवरून लष्करप्रमुखांच्या दौऱ्याबद्दल माहिती दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनबरोबरील वाद आणि हिवाळ्यातील तयारीचा आढावा या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांचा हा दौरा होता. 

तारा तळालाही भेट
लष्करप्रमुखांनी तारा या तळालाही भेट दिली. यावेळी त्यांनी तुकडीच्या कमांडरशी संवाद साधला. त्यांची सज्जता व उच्च नीतीधैर्याचेही नरवणे यांनी कौतुक केले.  लष्करप्रमुखांनी लडाखमधील रेचिन ला सह इतर ठिकाणांची पाहणी केली.  एलएसीजवळ लष्करासाठी केलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले, असे ट्विट भारतीय लष्कराने केले. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Army Chiefs visit to East Ladakh