esakal | लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या बांधकाम व्यवसायिकांसाठी गडकरींचा सल्ला; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Sell inventory at no-profit no-loss form own NBFCs says Gadkari tells realtors

देशातील बांधकाम उद्योजकांनी लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांच्याकडे तयार असलेली घरे ना नफा, ना तोटा तत्त्वावर विकून टाकावीत, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.

लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या बांधकाम व्यवसायिकांसाठी गडकरींचा सल्ला; म्हणाले...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील बांधकाम उद्योजकांनी लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांच्याकडे तयार असलेली घरे ना नफा, ना तोटा तत्त्वावर विकून टाकावीत, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गडकरी म्हणाले, 'सध्याच्या घडीला देशभरात अनेक बांधकाम प्रकल्पांमधील घरे पडून आहेत. लॉकडाऊमुळे पुढील काही काळ तरी घरांची खरेदी होणार नाही. या काळात बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज भरत राहावे लागेल. हे नुकसान टाळण्यासाठी कोणत्याही नफ्याची अपेक्षा न ठेवता ही घरे विकून टाकावीत. जेणेकरून बांधकाम उद्योजकांना त्यामधून आलेल्या पैशाचा वापर इतर प्रकल्पांसाठी करता येईल.

देशातील ही आहेत टॉप टेन कोरोनाग्रस्त राज्ये

आगामी काळात बांधकाम क्षेत्राने वाहन क्षेत्राप्रमाणे स्वत:च्या अशा बिगरबँकिंग वित्तसंस्था सुरु कराव्यात. वाहननिर्मिती क्षेत्राकडून अशा संस्थांच्या माध्यमातून ग्राहकांना कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. बांधकाम क्षेत्राकडूनही अशा संस्था सुरु झाल्यास त्यांना ग्राहकांना वेगाने आणि स्वस्त दरात कर्जपुरवठा करता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले. 

रामायण मालिकेने घडविला इतिहास

बांधकाम उद्योजकांनी आता केवळ घरउभारणी सोडून इतर क्षेत्रांकडे मोर्चा वळवला पाहिजे. पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक सुविधा आणि वेअरहाऊसिंग निर्मितीच्या क्षेत्रात अनेक संधी आहेत. तसेच, बांधकाम उद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्पांचा खर्च कमी केला पाहिजे. यामुळे भांडवलपुरवठा सुरळीत राहून प्रकल्पांचे काम सुरु ठेवता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.

loading image