esakal | कोर्ट मार्शल : लैंगिक अत्याचार प्रकरणी जवानाला ५ वर्षांची शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Court Marshal

कोर्ट मार्शल : लैंगिक अत्याचार प्रकरणी जवानाला ५ वर्षांची शिक्षा

sakal_logo
By
सुधीर काकडे

महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे दिसते आहे. अशाच एका घटनेत आर्मी कोर्टाने एका सैनिकाला शिक्षा सुनावली आहे. लष्करातील जवानावर कोर्ट मार्शलच्या माध्यमातून कारवाई झाली असून, आपल्या सहकाऱ्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी जवानाला सेवेतुन बडतर्फ करुन तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या या घटनेत सदरील शीख रेजिमेंटमधील एका जवानाने आपल्या सहकाऱ्याच्या ११ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर कोर्ट मार्शलच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. हा जवान सध्या राजस्थानमध्ये कर्तव्य बजावत होता. कोर्ट मार्शलने या जवानाला सेवेतून बडतर्फ करत ५ वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा: "काळा कोट घातला तर..."; सुप्रीम कोर्टाने वकीलाला फटकारले

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार जनरल कोर्ट मार्शलने ५ सप्टेंबर रोजी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत या जवानावर ही कारवाई करण्यात आली आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घडलेल्या या प्रकरणात १२ कमांडर्सच्या कोर्ट मार्शलने एका वर्षात निकाल दिला. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कुणालाच माफी मिळणार नाही, तसेच जलद गतीने अशा प्रकरणांचा निकाल लावण्यात येईल असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

loading image
go to top