esakal | "काळा कोट घातला तर..."; सुप्रीम कोर्टाने वकीलाला फटकारले
sakal

बोलून बातमी शोधा

Supreme Court of India

"काळा कोट घातला तर..."; सुप्रीम कोर्टाने वकीलाला फटकारले

sakal_logo
By
सुधीर काकडे

कोरोना महामारीमध्ये (Covid-19) जीव गमावलेल्या वकीलांच्या कुटूंबीयांना ५० लाख रुपये भरपाई देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court of India) याचिकाकर्त्याला खडसावले आहे. कोरोना महामारीच्या काळात मृत्यू झालेल्या वकीलांच्या कुटूंबीयांना ५० लाख रुपयांची मदत देण्यात यावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश चंद्रचूडा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने याचिका फेटाळून लावली आहे.

कोरोना महामारीच्या काळात जगभरात लाखो लोकांचे मृत्यू झाले. या काळात अनेकांनी आपले कुटूंबीय गमावले. एका वकीलाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत वकीलांच्या कुटूंबीयांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना याचिकाकर्त्या वकीलाला चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळते आहे. आपण काळ्या कोटमध्ये आहात म्हणून आपल्या जीवाची किंमत जास्त होत नाही. आपण वकील आहात, म्हणून आपण कोणतीही याचिका दाखल कराल, असे नाही होऊ शकत. अशा पद्धतिने प्रसिद्धि मिळवण्यासाठी याचिका करणे थांबवावे लागेल.

हेही वाचा: "...वह योगी कैसा?" राहुल गांधींनी थेट साधला आदित्यनाथांवर निशाणा

कोरोना काळात जगात अनेक लोकांचे जीव गेले आहेत, वकील त्या सर्वांपेक्षा वेगळे नाही हे सांगताना कोर्टाने हे विधान केले आहे. दरम्यान, वकील प्रदीप कुमार यादव यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत, कोरोना काळात मृत्यू पावलेल्या वकीलांच्या कूटूंबीयांना ५० लाख रुपये देण्याची मागणी केली होती.

loading image
go to top