जवानांकडून शत्रूंना योग्य उत्तरः लष्करप्रमुख

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जानेवारी 2019

नवी दिल्लीः आपले जवान नियंत्रण रेषेवरील शत्रूंना योग्य उत्तर देत आहेत. शत्रूचे मोठे नुकसान झाले आहे. मी, शत्रूंना चेतावणी देत आहे की, तुम्ही चुकीचे पाऊल उचलल्यास कारवाई करण्यास आम्ही संकोच करणार नाही, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे.

70 व्या लष्कर दिनानिमित्त दिल्लीमधील करिअप्पा मैदानात बोलताना व पाकिस्तानचा उल्लेख न करता बिपीन रावत म्हणाले, 'भारताच्या पश्चिम सीमारेषेवर असणारा देश दहशतवादी संघटनांना मदत करत असून, भारतीय लष्कर त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देत आहे. आपले जवान नियंत्रण रेषेवरील शत्रूंना योग्य उत्तर देत आहेत. शत्रूचे मोठे नुकसान झाले आहे.'

रावत यांनी सोशल मीडियाच्या गैरवापरावर चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की, 'आपल्या शत्रू राष्ट्रांकडून जवानांविरोधात सोशल मीडियाचा वापर होत आहे. सोशल मीडियाचा वापर करताना जवानांनी काळजी घेतली पाहिजे. शिवाय, आपल्या कुटुंबीयांनीही सोशल मीडिया जबाबदारीपणे वापरला पाहिजे.'

लष्कर जवानांसाठी एक मोबाइल अॅप लाँच करणार आहे. या अॅपशी जवानांचे आधार क्रमांक जोडले जाणार असून, या अॅपच्या माध्यमातून जवान आपल्या समस्या मांडू शकणार आहेत, असेही रावत म्हणाले.

Web Title: On Army Day Gen Bipin Rawat warns Pakistan