काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून जवानाचे अपहरण

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमध्ये रमजानच्या काळात शस्त्रसंधी लागू असताना दहशतवाद्यांनी एका जवानाचे आज (गुरुवार) अपहरण केल्याची घटना घडली आहे.

अपहरण करण्यात आलेल्या जवानाचे नाव औरंगजेब असून ते पुँछ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातून त्यांचे अपहरण करण्यात आले आहे.

सरकारने शस्त्रसंधी लागू केल्यापासून स्थानिक जवानांच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दगडफेक करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दगडफेकीचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक युवक हे दहशतवाद्यांना मदत करताना दिसत असून स्थानिकांच्या मदतीनेच दहशतवाद्यांनी जवानाचे अपहरण केले आहे.

Web Title: Army jawan abducted in Pulwama jammu kashmir