Army Major Accident : उंटाला धडकली आर्मी मेजरची भरधाव कार, महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या मेजरचा जागीच मृत्यू, दोन लेफ्टनंट गंभीर जखमी

Indian Army Major Death : राजस्थानातील जैसलमेर येथे भरधाव आर्मी एसयूव्हीची उंटाला धडक बसून भीषण अपघात झाला. महिन्याभरापूर्वी विवाह झालेल्या भारतीय लष्करातील मेजरचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लेफ्टनंट अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.
Army Major Accident rajasthan

Army Major Accident rajasthan

esakal

Updated on

Jaisalmer Road Accident : राजस्थानातील जैसलमेर येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात भारतीय लष्करातील एका मेजर अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. यांच्यासह दोन लेफ्टनंट अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग-11 वरील आर्मी परिसरात उशिरा रात्री लष्करी अधिकाऱ्यांना घेऊन जाणारी एसयूव्ही अचानक रस्त्यावर आलेल्या उंटाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की वाहनावरील चालकाचा ताबा सुटून गाडी रस्त्याखाली जाऊन पलटी झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com