
श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाच्या बोर्डिंग गेटवर एका लष्करी अधिकाऱ्यानं चार कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी या घटनेची माहिती दिली आहे. ही घटना २६ जुलै रोजी घडली जेव्हा अधिकाऱ्याला अतिरिक्त केबिन बॅग घेऊन जाण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील असं सांगण्यात आल्यानं लष्करी अधिकारी संतापला आणि त्याने एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली.